आयपीएलमधील सर्वात महागडी फ्रेंचायझी कोणती? हा संघ सर्वात कमी किमतीचा!

आयपीएल स्पर्धेत सलग दोन वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मूल्यांकनाचा नवा मापदंड स्थापित केला आहे. चला जाणून घेऊयात आयपीएलमधील 10 फ्रेंचायझीचं मूल्यांकन

| Updated on: Jul 29, 2026 | 9:40 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेतील सहभागी असलेल्या फ्रेंचायझीपैकी कोणती फ्रेंचायझी मौल्यवान आहे? याचं उत्तर Houlihan Lokey रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. रिपोर्टनुसार सध्याच्या घडीला सर्वात महागडी फ्रेंचायझी म्हणून आरसीबीची गणना आहे. आरसीबीचं मूल्यांकन 312 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 2982 कोटी आहे. (PC-PTI)

2 / 5

दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी आहे. या फ्रेंचायझीचं मूल्यांकन 264 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 2524 कोटी रुपये आहे. तर केकेआर फ्रेंचायझीची किंमत 2342 कोटी असून तिसऱ्या क्रमांकावर आहे. (PC-PTI)

3 / 5

चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या फ्रेंचायझीचं मूल्यांकन 2333 कोटी रुपये आहे. तर सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझी पाचव्या क्रमांकावर असून मूल्यांक 1606 कोटी आहे. (PC-PTI)

4 / 5

राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझी सहाव्या क्रमांकावर असून मूल्यांकन 1539 कोटी रुपये आहे. तर पंजाब किंग्सचं मूल्यांकन 1510 कोटी असून सातव्या क्रमांकावर आहे.(PC-PTI)

5 / 5

गुजरात टायटन्स आठव्या क्रमांकवर असून मूल्यांकन 1501 कोटी, दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर असून मुल्यांकन 1491 कोटी आणि लखनौ सुपर जायंट्स शेवटच्या स्थानावर असून मूल्यांकन 1166 कोटी आहे. (PC-PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us