आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये आरसीबीचं स्थान निश्चित, पण टॉप 2 साठी कसं असेल गणित

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 12 सामने खेळले असून यापेकी आठ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला असून त्यात एक गुण मिळाला आहे. सध्या 17 गुणांसह आरसीबी संघ टॉप 2 मध्ये आहे. आता साखळी फेरीतील दोन सामने शिल्लक आहेत. कसं असेल पुढचं गणित ते समजून घ्या.

| Updated on: May 19, 2025 | 3:36 PM
1 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आरसीबी सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे.रॉयल्सचे अजूनही दोन सामने शिल्लक आहेत. आरसीबी शेवटचे दोन्ही सामने जिंकून अतिरिक्त 4 गुण मिळवू शकते. (PHOTO_IPL/BCCI)

2 / 5
आरसीबीने उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर 21 गुणांसह गुणतालिकेत पहिलं किंवा दुसरं स्थान मिळवू शकते. म्हणजेच पहिला क्वॉलिफायर सामना खेळण्याची संधी मिळू शकते. हा सामना जिंकला तर थेट अंतिम फेरी आणि हरला तर क्वॉलिफायर दोन सामना खेळण्याची संधी मिळेल. (PHOTO_IPL/BCCI)

3 / 5
गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सने त्यांचे पुढील दोन सामने जिंकल्यास एकूण 22  गुण होतील. यामुळे तुम्ही पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी पात्र होईल. दरम्यान, आरसीबीने पुढील दोन सामने जिंकल्यास त्यांना एकूण 21 गुण मिळतील. पण पंजाब किंग्सच्या कामगिरीवर लक्ष ठेवून राहावं लागेल. (PHOTO_IPL/BCCI)

4 / 5
पंजाब किंग्स संघाचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. जर पंजाबने हे सामने जिंकले तर त्यांना एकूण 21 गुण मिळतील. जर नेट रनरे चांगला राहीला तर पंजाब किंग्स आरसीबीला मागे टाकू शकते. तसेच गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकते. (PHOTO_IPL/BCCI)

5 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिल्या क्वालिफायरसाठी पात्र व्हायचे असेल तर त्यांना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल. आरसीबी चांगल्या नेट रन रेटसह 21 गुण मिळवू शकतात आणि पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवू शकतात. (PHOTO_IPL/BCCI)