
विराट कोहली आणि गौतम गंभीर आयपीएलच्या 16 व्या मोसमात भिडले होते. तेव्हा या दोघांच्या राड्याची जोरदार चर्चा झाली होती.

विराट-गंभीर या दोघांमध्ये राडा होण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. याआधीही विराट- गंभीर भिडले होते.

विराट-गंभीर यांच्यात आयपीएलमधील पहिला राडा हा 2013 साली झाला आहे. आयपीएल स्पर्धेत 2013 साली आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात सामना झाला.

आयपीएल 2013 मध्ये गौतम गंभीर याच्याकडे केकेआरची सूत्रं होती. तर आरसीबीचं कर्णधारपद विराट कोहली सांभाळत होता. स्पर्धेतील 12 व्या सामन्यात विराट कोहली लक्ष्मीपती बालाजी याच्या बॉलिंगवर आऊट झाला. तेव्हा गंभीर विराटला काही तरी बोलला होता.

गंभीरने डिवचल्यानंतर विराटनेही प्रत्युत्तर दिलं. यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर फिल्ड अंपायर्स आणि खेळाडूंनी दोघांमध्ये मध्यस्थी केली.

आरसीबीने हे सामना 8 विकेट्सने जिंकला. विराटने आरसीबीसाठी तेव्हा 35 धावा केल्या.