
आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. पहिल्या चार सामन्यात आरसीबी चॅम्पियन संघांशी सामना करणार आहे. हे चारही संघ बलाढ्य आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दुसरा सामना 28 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जशी होईल. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईने आतापर्यंत पाच जेतेपदांवर नाव कोरलं आहे.

2 एप्रिल रोजी तिसऱ्या सामन्यात आरसीबीचा सामना 2022 च्या विजेत्या गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

7 एप्रिल रोजी आरसीबीचा चौथा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सशी होईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

आरसीबीचा सामना 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स, 13 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि 18 एप्रिल रोजी पंजाब किंग्जशी होईल. आरसीबी पहिल्या फेरीत बेंगळुरूमध्ये फक्त तीन सामने खेळेल.