
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका आता निर्णायक वळवणावर आली आहे. पाच सामन्यापैकी तीन सामने पार पडले असून इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारताने तिसरा कसोटी सामना अवघ्या 22 धावांनी गमावला. त्यामुळे चौथ्या सामन्यात करो या मरोची स्थिती आहे. (Photo- BCCI)

आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात भारताचा विकेटकीपर फलंदाज आणि उपकर्णधार ऋषभ पंतची खेळी महत्त्वाची ठरली आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात त्याने 2 अर्धशतकांसह 2 शतकं ठोकली आहे. यासह त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत एक मोठा विक्रम नावावर केला आहे. (Photo- BCCI)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. त्याने चारही पर्वात 15हून अधिक षटकार मारण्याची किमया साधली आहे. या पर्वात तर त्याने फक्त तीन सामन्यात हा विक्रम गाठला आहे. (Photo- BCCI)

ऋषभ पंतने पहिल्या पर्वात 22 षटकार, दुसऱ्या पर्वात 16 षटकार, तिसऱ्या पर्वात 16 षटकार मारले होते. आता तर चौथ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. त्यातील तीन सामन्यातच 15हून अधिक षटकार मारले आहेत. (Photo- BCCI)

मँचेस्टर कसोटी सामन्यात ऋषभ पंतकडे एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. पण ऋषभ पंतला बोटाची दुखापत असल्याने त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. या सामन्यात जर खेळला तर भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरू शकतो. वीरेंद्र सेहवागने 90 षटकार मारले आहेत. तर पंतच्या नावावर 88 षटकार आहेत. (Photo- BCCI)