
बीसीसीआयने या वर्षासाठी केंद्रीय करार यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयच्या करारात एकूण 34 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदाच 9 नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनाही दिलासा दिला आहे.

बीसीसीआयने त्यांच्या केंद्रीय करार यादीतून फक्त एकाच खेळाडूला बढती दिली आहे. कार अपघातातून वाचलेल्या आणि टीम इंडियामध्ये कमबॅक करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला ब श्रेणीतून अ श्रेणीत बढती देण्यात आली आहे.

2022 मध्ये झालेल्या एका जीवघेण्या कार अपघातामुळे पंतच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पण त्याने पुनरागमन केले आणि अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. 2024 चा टी20 विश्वचषक जिंकण्यातही पंतने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. पण त्याच्याऐवजी केएल राहुलला संधी मिळाली होती. बीसीसीआयचा हा करार केवळ आर्थिक बक्षीस नाही, तर तो बोर्डाचा खेळाडूवरील विश्वास आणि महत्त्व दर्शवतो. बीसीसीआय दरवर्षी ब श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी रुपये देते. तर अ श्रेणीतील खेळाडूंसाठी 5 कोटी रुपये देते.

बीसीसीआयने अ श्रेणीत एकूण 6 खेळाडूंचा समावेश केला आहे. मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांनी त्यांचे स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. तर आर अश्विनला वगळण्यात आले असून त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)