
श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेत भारतीय संघाचे तीनतेरा वाजले. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत संपला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताला 32 धावांनी आणि तिसरा सामन्यात 110 धावांनी पराभूत केले.

फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर कर्णधार रोहित शर्मा तग धरू शकला. कर्णधार रोहित शर्मा दोन अर्धशतकं ठोकली. तसेच तिसऱ्या सामन्यात सर्वाधिक 35 धावा केल्या. या मालिकेतील तीन सामन्यात रोहितच्या बॅटमधून एकूण 157 धावा आल्या.

रोहित शर्माने आपल्या या खेळीसह एका विक्रमाची नोंद केली आहे. भारतीय संघ सध्याच्या वेळापत्रकानुसार 2024 मध्ये एकही वनडे मालिका खेळणार नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धची शेवटची वनडे मालिका होती.

रोहित शर्माची या वर्षात वनडे फॉरमॅटमध्ये फलंदाजीची सरासरी 52.33 आहे. यासह रोहितने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 11व्यांदा फलंदाजीची सरासरी 50 च्या वर ठेवली आहे. रोहितने 2011 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 55.55 च्या सरासरीने धावा केल्या होत्या, तर 2018 मध्ये त्याने 73.57 च्या सरासरीने धावा करत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.

रोहितनंतर विराट कोहलीचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 9 वेळा 50 च्या वर सरासरीने फलंदाजी केली आहे. एमएस धोनीने 8 वेळा, रॉस टेलरने 8 वेळा, एबी डीव्हिलियर्सने 8 वेळा, सचिन तेंडुलकरने 7 वेळा, मायकल बेवनने 7 वेळा अशी कामगिरी केली आहे.