
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्धचा दुसरा कसोटी सामना 7 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने नववर्षाची सुरुवात विजयाने केली.

टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राखली. त्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर या दोघांनी ट्रॉफी शेअर केली. डीन एल्गरचा हा अखेरचा कसोटी सामना होता.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी डीन एल्गरला खास पद्धतीने निरोप दिला. कॅप्टन रोहित शर्माने डीन एल्गरला टीम इंडियातील सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली.

सामना आटोपल्यानंतर विराट कोहली याने डीन एल्गरसह संवाद साधला. या दोघांचा फोटो आयसीसीने शेअर केला आहे.

तसेच सामन्यादरम्यान डीन एल्गर आऊट झाल्यानंतर मोहम्मद सिराज याने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सांगता आणि नववर्षाची सुरुवात विजयाने केली. त्यामुळे टीम इंडियाकडून या वर्षभरात अशाच कामिगरीची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.