रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात धोनीचा विक्रम मोडला, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल होताच रोहित शर्माच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. महेंद्रसिंह धोनीला मागे टाकत त्याने मोठा विक्रम नावावर केला आहे.

| Updated on: Feb 20, 2025 | 4:46 PM
1 / 5
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात केला आहे. रोहित शर्माने कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं आहे. तर विराट कोहलीने धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

2 / 5
रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दिला 2007 मध्ये सुरुवात झाली. त्याने 2007 मध्ये टी20 वर्ल्डकप खेळला होता. आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्याचा 15वा मर्यादीत षटकांची आयसीसी स्पर्धा आहे. यासह त्याने भारतासाठी सर्वाधिक मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा खेळण्याचा विक्रम केला आहे.

3 / 5
रोहित शर्मापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या नावावर हा विक्रम होता. त्याने 14 मर्यादीत षटकांच्या आयसीसी स्पर्धेत खेळला होता. आता रोहित शर्मा हा सर्वाधिक आयसीसी स्पर्धा खेळणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.

4 / 5
 दुसरीकडे, विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीची बरोबरी साधली आहे. त्याच्या नावावरही 14 स्पर्धा झाल्या आहेत. युवराज सिंगने त्याच्या कारकिर्दीत 14 मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा देखील खेळल्या.

5 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मर्यादीत षटकांच्या आयसीसी स्पर्धा खेळण्याचा विक्रम ख्रिस गेल, महेला जयवर्धने, शाहिद आफ्रिदी आणि शाकिब अल हसनच्या नावावर आहे. हे खेळाडू प्रत्येकी 16 स्पर्धा खेळले आहेत.