
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टॉस जिंकला. दक्षिण आफ्रिकेने या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिका 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर असल्याने त्यांच्यासाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे.

टीम इंडियाकडून या दुसऱ्या सामन्यातून आक्रमक फलंदाजाने पदार्पण केलं आहे. हा फलंदाज पहिल्याच बॉलपासून फटकेबाजी करण्यात माहिर आहे.

रिंकू सिंह याने वनडे डेब्यू केलं आहे. रिंकूने आयर्लंड विरुद्ध टी 20 तर आता दक्षिण आफ्रिके विरुद्ध त्याने एकदिवसीय पदार्पण केलंय.

रिंकूला कुलदीप यादव याने कॅप देऊन टीम इंडियात स्वागत केलं. यावेळेस इतर खेळाडूंनी रिंकू सिंह याचं अभिनंदन आणि वनडे टीममध्ये स्वागत केलं.

रिंकू सिंह याचा श्रेयस अय्यर याच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी या वनडे सीरिजमधून बाहेर पडला आहे.