IPL 2023 | दिग्गज बॅट्समनचा फ्लॉप शो, आयपीएलआधी टीम मॅनेजमेंटचं डोकं जाम

सूर्यकुमार यादव सलग तिसऱ्यांदा शून्यावर आऊट झाल्याने त्याला ट्रोल व्हावं लागलंय. त्यात आता आणखी एक फलंदाज हा झिरोवर आऊट झाल्याने टीममध्ये चिंतेचं वातावरण आहे.

| Updated on: Mar 25, 2023 | 9:50 PM
1 / 5
आयपीएलचा 16 वा हंगाम काही दिवसांवर असताना लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज क्विंटन डी कॉक याच्या कामगिरीने टीम मॅनजमेंटंच डोकं जाम झालं आहे.

2 / 5
क्विंटन डी कॉक याने लखनऊ सुपर जायंट्ससाठी गेल्या 15 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी केली होती.  मात्र आयपीएलच्या 16 व्या पर्वाआधी क्विंटनला सूर सापडत नाहीये, असंच काहीसं चित्र आहे.

3 / 5
दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडिज यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील क्विंटन डी कॉक अपयशी ठरला. क्विंटन भोपळा न फोडता आऊट झाला. क्विंटनला विंडिजचा स्पिनर अकील होसैन याने आऊट केलं.

4 / 5
दरम्यान क्विंटनची स्वसतात आऊट होण्याची ही काही पहिली वेळ नाही. क्विंटन टी 20 क्रिकेटमध्ये सलग चौथ्यांदा धावा करण्यात अपयशी ठरला. क्विंटनने 4 डावात अनुक्रमे 0, 13, 1 आणि 0 अशा धावा केल्या आहेत.

5 / 5
डी कॉक याने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 15 सामन्यांमध्ये 508 धावा केल्या होत्या. यासह क्विंटन स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याबाबत तिसरा आणि लखनऊ टीमकडून दुसरा फलंदाज ठरला होता. क्विंटनने या दरम्यान  140 धावांची वादळी खेळी केली होती.