Sarfaraz Khan : फिटनेस व्यतिरिक्त दुसरं कारण तर नाही ना! सरफराज खानला संधी न मिळाल्याने रंगली अशी चर्चा

मुंबईच्या सरफराज खान याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न झाल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. फिटनेससोबत त्याला गैरवर्तन भोवल्याचं जोरदार चर्चा सुरु आहे. त्याची निवड संघात न झाल्याने माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

| Updated on: Jun 26, 2023 | 9:39 PM
1 / 5
देशांतर्गत 54 प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत सरफराज खानने 3550 धावा केल्या आहेत. मात्र इतकी कामगिरी करूनही संघात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे सुनील गावस्कर आणि हरभजन सिंगने आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरफराजचा एव्हरेज जवळपास 80 चा आहे.

2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार सरफराजला फिटनेससोबत गैरवर्तनामुळे संघात स्थान मिळालं नसल्याची जोरदार चर्चा आहे. सरफराजने दिल्ली विरुद्ध शतक ठोकल्यानंतर ड्रेसिंग रुमकडे बोट दाखवलं होतं.त्याच्या या कृतीमुळे निवड समिती सदस्य नाराज झाल्याची चर्चा आहे.

3 / 5
सरफराज खानने ड्रेसिंग रुमकडे बोट दाखवत आक्रमकपणे आनंद साजरा केला होता. यावेळी निवड समितीचे सदस्य सलील अंकोला स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचं बोललं जात आहे.

4 / 5
सामन्यात सरफराज खान याने मुंबई संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना बोट दाखवून आनंद साजरा केला होता. तेव्हा प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी आपली टोपी काढून कामगिरीचं कौतुक केलं होतं.

5 / 5
तणावपूर्ण स्थितीत संघाला विजयापर्यंत नेत तणाव कमी केल्याने सरफराज खान याने अशा पद्धतीने सेलिब्रेशन केल्याचं त्याच्या जवळच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे. तसेच त्या कृतीचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचं बोललं जात आहे.