
भारताच्या स्वीटी बूरा हीने वूमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. यासह स्वीटीने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

स्वीटीने चीनच्या लीना वांग हीचा थरारक झालेल्या सामन्यात पराभव करत भारताला गोल्डन मेडल जिंकून दिलंय.

आयजी स्टेडियममध्ये या अंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

स्वीटी बूरा हीने 81 किलो वजनी गटात चुरशीच्या झालेल्या सामन्यात वांग लीना हीचा 4-3 अशा फरकाने विजय मिळवला.