Imran Khan: इम्रान खान यांच्या सुटकेसाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार सरसावले! परराष्ट्र मंत्र्यांकडे केली मागणी

पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद असलेले महान क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या समर्थनार्थ ऑस्ट्रेलियाचे सात माजी कर्णधार एकत्र आले आहेत. त्यांनी इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत आणि आरोग्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

| Updated on: Sep 15, 2026 | 2:23 PM
1 / 5
महान क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या समर्थनार्थ ऑस्ट्रेलियन सात कर्णधारांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉन्ग यांना थेट एक पत्र लिहिले आहे. तसेच या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आणि संपर्क साधण्याची खास अपील केली आहे. (Photo: Getty)

महान क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या समर्थनार्थ ऑस्ट्रेलियन सात कर्णधारांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉन्ग यांना थेट एक पत्र लिहिले आहे. तसेच या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आणि संपर्क साधण्याची खास अपील केली आहे. (Photo: Getty)

2 / 5

या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी महान कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, किम ह्युजेस, मार्क टेलर आणि स्टीव्ह वॉ यांसारख्या अत्यंत आदराने घेतल्या जाणाऱ्या नावांचा समावेश आहे. (Photo: Getty)

3 / 5

सात कर्णधारांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ते कोणत्याही राजकीय किंवा राजनैतिक भूमिकेतून हे पत्र लिहीत नसून, केवळ क्रिकेटचे माजी कर्णधार म्हणून आपली बाजू मांडण्याची गरज वाटल्याने एकत्र आले आहेत. (Photo: Getty)

4 / 5

पत्रात पुढे लिहिले आहे की, इम्रान खान यांचे प्रकरण हा जरी पूर्णपणे पाकिस्तानचा अंतर्गत विषय असला, तरी कोणत्याही कैद्याला दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत त्यांना चिंता वाटते. हा केवळ मूलभूत माणुसकीचा मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Photo: Getty)

5 / 5

आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातून इम्रान खान यांच्यासाठी अशी अपील होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी जगातील 22 माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना पत्र लिहून इम्रान खान यांना जेलमध्ये योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देण्याची मागणी केली होती. (Photo: Getty)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us