
श्रेयस अय्यर याने श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात धमाका केलाय. श्रेयसने पाकिस्ताननंतर श्रीलंका विरुद्ध अर्धशतक ठोकलं.

श्रेयसने श्रीलंका विरुद्ध 82 धावांची खेळी केली. श्रेयसचं आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील हे दुसरं अर्धशतक ठरलं.

श्रेयसने 82 धावांच्या खेळीत श्रीलंका विरुद्ध 6 सिक्स ठोकले. तसेच 3 चौकारही लगावले.

श्रेयसच्या या 82 धावांच्या झंझावाती खेळीमुळे टीम इंडियाला 350 पेक्षा अधिक धावा करता आल्या. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 357 धावा केल्या.

श्रेयसने 6 सिक्स ठोकत मोठ्या विक्रमाची बरोबरी केलीय. श्रेयसने वर्ल्ड कपमधील एका सामन्यात 6 सिक्स ठोकण्याच्या रोहितच्या विक्रमाची बरोबरी केलीय.