
शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली. शुबमन गिलने शतक ठोकत विरोधकांची तोंडं बंद केली आहेत. असं असताना शुबमन गिलच्या बॅटची चर्चा रंगली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण शुबमन गिलची बॅट ही टेम्बा बावुमाच्या बॅटच्या तुलनेत स्वस्त आहे. (Photo- PTI)

शुबमन गिल एमआरएफच्या प्रिन्स बॅटसह खेळतो. याच वर्षी त्याची कंपनीसोबत डील झाली होती आणि त्याला वार्षिक 10 कोटी रुपये मिळणार आहेत. पण शुबमन गिल ज्या बॅटचा वापर करतो त्याची किंमत तुलनेने स्वस्त आहे. (Photo- PTI)

बॅट कंपनीच्या वेबसाईटनुसार शुबमन गिल वापरत असलेल्या बॅटची किंमत 53 ते 55 हजार रुपये आहे. तुलनेने दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाच्या बॅटची किंमत अधिक आहे. (Photo- PTI)

टेम्बा बावुमा डीएससीच्या ब्लॅक एडिशन बॅटने खेळतो. याची किंमत 75 हजाराहून अधिक आहे. म्हणजेच बावुमाच्या बॅटची किंमत गिलच्या बॅटच्या तुलनेत जवळपास 20 हजाराने अधिक आहे. (Photo- PTI)

शुबमन गिलची बॅटची किंमत कितीही असो पण त्याच्या फॉर्मची किंमत आता सर्वात अधिक आहे. शुबमन गिल कर्णधार होताच इंग्लंडमध्ये चमकला आहे. त्याने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली. (Photo- PTI)