
आयपीएल 2008 स्पर्धेचं पहिलंच पर्व हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्या वादाने गाजलं. गेली अनेक वर्षे हे प्रकरण या ना त्या कारणाने चर्चेत येतं. पण या घटनेचा व्हिडीओ प्रत्यक्षात कोणी पाहिला नव्हता. पण 18 वर्षानंतर व्हिडीओ समोर आला आणि प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. (फोटो- PTI)

हरभजन सिंगने एस श्रीसंतला कधी आणि कशी कानाशिलात मारली याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेली चर्चा प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळाली. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हरभजन सिंग संतापला आहे. त्याने ललित मोदीवर गंभीर आरोप केला आहे. (फोटो- youtube.com/@Beyond23CricketPod)

व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर हरभजन सिंगने सांगितलं की, या मागे काहीतरी वाईट विचार आहे. काही तरी कारण असल्याने असं केलं गेलं आहे.'ज्या पद्धतीने हा व्हिडीओ लीग केला गेल हे चुकीचं आहे. असं व्हायला नको होतं. हे कामं स्वत:च्या स्वार्थासाठी केलं गेलं आहे. ही घटना 18 वर्षांपूर्वी घडली होती. लोकं ही विसरून गेले होते. लोकांना परत आठवण करून दिली जात आहे.', असं हरभजन सिंग म्हणाला. (फोटो- PTI/Video Grab)

आयपीएलचं पहिलं पर्व 2008 साली पार पडलं होतं. त्यावेळी ही घटना घडली होती. पंजाब किंग्सने या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर हस्तांदोलन करताना हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. (फोटो- PTI)

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्क याने ललित मोदींची मुलाखत घेतली होती. या मुलाखती दरम्यान ललित मोदीने हरभजन-श्रीसंतचा व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पुन्हा एकदा कानशिलात मारल्याचं प्रकरण चर्चेत आलं. (फोटो- PTI)