IND vs AUS : स्मृती मंधानाची शतकाची संधी हुकली, पण काही विक्रम केले नावावर

भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियात देदिप्यमान कामगिरी केली आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने मात दिली. तिसऱ्या सामन्यात स्मृती मंधानाने जबरदस्त कामगिरी केली. पण तिचं शतक हुकलं. असं असलं तरी काही विक्रम तिने नावावर केले आहेत.

| Updated on: Feb 21, 2026 | 6:34 PM
1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात तीन सामन्यांच्या निर्णायक सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 159 धावांपर्यंत मजल मारू शकला. हा सामना भारताने 17 धावांनी जिंकला. या सामन्यात स्मृती मंधानाची खेळी महत्त्वाची ठरली. (Photo- BCCI Women Twitter)

2 / 5
तिसऱ्या टी20 सामन्यात स्मृती मंधानाची बॅट चांगलीच तळपली. तिने 55 चेंडू त 8 चौकार आणि 3 षटकार मारून 82 धावांची खेळी केली. यावेळी स्मृती मंधानाचा स्ट्राईक रेट हा 149.09 चा होता. तिच्याकडे शतक ठोकण्याची संधी होती. पण शतक फक्त 18 धावांनी हुकलं. (Photo- BCCI Women Twitter)

3 / 5
स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी करत तिचे 35वे टी20 अर्धशतक पूर्ण केले. 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या 15 चेंडूत 30 धावा केल्या. षटकार मारण्याच्या प्रयत्नात स्मृती मंधाना झेल बाद झाली. (Photo- BCCI Women Twitter)

4 / 5
स्मृती मंधानाने रॉड्रिग्जसोबत दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारीही केली. स्मृती मंधानाचे ऑस्ट्रेलियन भूमीवरील पहिले टी20 शतक हुकले. पण ऑस्ट्रेलियन भूमीवर आंतरराष्ट्रीय टी20 डावात 80 पेक्षा जास्त धावा करणारी ती पहिली भारतीय फलंदाज ठरली. (Photo- BCCI Women Twitter)

5 / 5
स्मृती मंधाना ऑस्ट्रेलियामध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500पेक्षा जास्त धावा करणारी ती पहिली भारतीय फलंदाज ठरली. मंधानाने कांगारूंच्या भूमीत 18 डाव खेळले आहेत. यात तिने चार अर्धशतकांसह 529धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Women Twitter)