
डावखुरी स्मृती मंधाना भारताची स्टार फलंदाज आहे. आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत तिची बॅट चांगलीच तळपली आहे. त्यामुळे आयसीसी वनडे क्रमवारीत तिचं पहिलं स्थान अबाधित आहे. पण हे स्थान आणखी काही दिवस कायम असेल हे स्पष्ट झालं आहे. त्याला कारणही तसंच आहे. (PHOTO- PTI)

स्मृती मंधानाची वनडे रेटिंग पॉइंट हे 828 झाले असून करिअरमधील बेस्ट टप्पा आहे. यासह स्मृतीने एशले गार्डनरला जवळपास 100 गुणांनी मागे टाकलं आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्मृती मंधाना पहिल्या स्थानावर कायम राहील हे स्पष्ट आहे. (PHOTO- PTI)

स्मृती मंधानाने वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 365 धावांची खेळी केली आहे. यात तिने एक शतकही ठोकलं आहे. दुसरीकडे, दुखापतग्रस्त प्रतिका रावलनेही वनडे क्रमावारीत मोठी झेप घेतली आहे. (PHOTO- PTI)

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिकाने आतापर्यंत 308 धावांची खेळी केली असून टॉप 30 मध्ये एन्ट्री केली आहे. आता ती 27 व्या स्थानावर आहे. पण साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध फिल्डिंग करताना जखमी झाल्याने उर्वरित स्पर्धेला मुकली आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धक्का बसला आहे. (PHOTO- PTI)

गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एक्सेलस्टोन अव्वल स्थानी आहे. तिला ऑस्ट्रेलियाची फिरकीपटू एलाना किंगचं थेट आव्हान आहे. भारताची दीप्ती शर्माने टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आहे. तर रेणुका सिंह ठाकुर 19 व्या, स्नेह राणा 23 व्या, क्रांती गौड 25व्या आणि श्री चरणी 30व्या स्थानावर आहे. (PHOTO- PTI)