
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघासोबत सौरव गांगुली काम करत आहे. आता इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्पर्धेतही आपलं नशिब पणाला लावणार आहे. (PC-PTI)

सौरव गांगुलीने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या टायगर्स ऑफ कोलकाता संघाचे मालकी हक्क घेतले आहेत. गांगुली या संघाचा सह मालक असणार आहे. या मालिकेला 9 जानेवारीपासून सूरतमध्ये सुरुवात होणार आहे. अंतिम सामना 6 फेब्रुवारीला होणार आहे. (PC-PTI)

इंडियन स्ट्रीट प्लेयर लीग ही स्पर्धा टेनिस बॉलने खेळली जाते. यात 10-10 षटकांचे सामने खेळले जाणार आहेत. सचिन तेंडुलकर या लीगच्या कोअर कमिटी सदस्य आहे. आता सौरव गांगुलीही या स्पर्धेत सहभागी झाला आहे. (PC-PTI)

सौरव गांगुलीने आयएसपीएलशी जोडल्यानंतर सांगितलं की, 'मी या नव्या प्रवासासाठी खूपच उत्साहित आहे. टेनिस बॉल क्रिकेटपासूनच सर्व खेळायला सुरुवात करतात. हे पूर्व भारतात आणि खासकरून कोलकात्या खूपच प्रसिद्ध आहे. माझं लक्ष्य या खेळाडूंना मदत करण्याचं आहे.' (PC-PTI)

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्पर्धेत विजय पावले हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला माझी मुंबई संघाने 32.5 लाखात विकत घेतलं आहे. या पर्वात 144 खेळाडूंवर 10 संघांनी 10 कोटी रुपये खर्च केले आहेत. (PC-PTI)