
दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 30 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका विजयाची संधी दक्षिण अफ्रिकेकडे आहे. दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला तरी मालिका दक्षिण अफ्रिकेच्या नावावर होईल. (फोटो- Proteas Men Twitter)

दक्षिण अफ्रिकेने कसोटी क्रिकेटमध्ये टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला गवसणी घातली आहे. आता भारत दौऱ्यातही दक्षिण अफ्रिका यश मिळवताना दिसत आहे. आता गुवाहाटी कसोटी जिंकताच टेम्बा बावुमा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. (फोटो-Getty Images)

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेचा संघ एकही कसोटी सामना पराभूत झालेला नाही. त्याने 11 कसोटी सामन्यात संघाची धुरा सांभाळली. त्यात 10 सामन्यात विजय मिळवला. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेत दक्षिण अफ्रिकेचा पराभव झाला होता. पण तेव्हा टेम्बा बावुमा मालिकेत नव्हता. संघाची धुरा एडन मार्करमच्या खांद्यावर होती. (फोटो- Proteas Men Twitter)

गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेने दुसरा कसोटी सामना जिंकला तर भारताला व्हाईट वॉश मिळेल. दुसरीकडे, टेम्बा बावुमा आपल्या नेतृत्वाखाली पहिल्या पराभवापूर्वी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा जगातील पहिला कसोटी कर्णधार ठरेल. (Photo: PTI)

टीम इंडियाने गुवाहाटी कसोटी गमावली तर 2000 नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियाला व्हाईटवॉश करेल. यापूर्वी 2000 मध्ये, हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकला होता. (फोटो- Proteas Men Twitter)