
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत रवि बिश्नोईने जबरदस्त कामगिरी केली. पाच सामन्यात सर्वाधिक 9 गडी बाद केले. रवि बिश्नोईच्या जबरदस्त कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द सीरिजने गौरविण्यात आलं होतं. आता त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

भारतीय फिरकीपटू रवि बिश्नोई टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज ठरला आहे. रवि बिश्नोईने अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला मागे टाकलं आहे.

रवि बिश्नोई 699 रेटिंगसह पहिल्या स्थानावर, तर राशिद खान 692 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा 679 गुणांसह तिसऱ्या, इंग्लंडचा आदिल राशीद 679 गुणांसह चौथ्या आणि महीश थीक्षाणा 677 गुणांसाह पाचव्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या रवि बिश्नोई याची निवड दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी केली आहे. बिश्नोईला टी20 संघात स्थान मिळालं आहे.

23 वर्षीय रवि बिश्नोईने टीम इंडियासाठी आतापर्यंत 1 वडे आणि 21 टी20 सामने खेळले आहेत. वनडेत 1, तर टी20 मध्ये 34 गडी बाद केले आहेत.

रवि बिश्नोईचा हा फॉर्म कायम राहिल्यास आगामी टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये स्थान मिळू शकते. टी20 वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार आहे. यात एकून 20 संघ सहभागी होणार आहे.