लसिथ मलिंगाला मिळालं फक्त 21 दिवसांचं काम, पण असेल मोठी जबाबदारी

श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला एक मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्याला संघाच्या वेगवान गोलंदाजीचा सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. 21 दिवसांचं काम असलं तरी त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

| Updated on: Dec 30, 2025 | 7:56 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून जोरदार तयारी सुरु झाली आहे. असं असताना श्रीलंकेच्या माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला मोठी जबाबदारी मिळाली आहे. (Photo- PTI)

2 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी लसिथ मलिंगाची वेगवान गोलंदाज सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. 15 डिसेंबरपासून त्याने काम सुरु केलं होतं. पण त्यात आणखी 21 दिवसांसाठी मुदत वाढ दिली असून 25 जानेवारीपर्यंत संघासोबत असेल. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने लसिथ मलिंगाला राष्ट्रीय संघाचा वेगवान गोलंदाज सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. (PC-AFP)

3 / 5
लसिथ मलिंगाकडे ही जबाबदारी 5 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान आहे. मलिंगाचं काम वेगवान गोलंदाजांना टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी तयार करण्याचं आहे. लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये 500हून अधिक विकेट घेतल्या आहेत. त्याच्याकडे चांगला अनुभव असून त्याचा फायदा श्रीलंकन संघाला होईल. (PC-AFP)

4 / 5
श्रीलंका क्रिकेट मंडळाने एका निवेदनात म्हटले आहे की, "आगामी विश्वचषकासाठी श्रीलंकेची तयारी बळकट करण्यासाठी मलिंगाचा आंतरराष्ट्रीय अनुभव आणि डेथ बॉलिंगमधील प्रसिद्ध कौशल्याचा फायदा घेण्याचे उद्दिष्ट आहे. विशेषतः टी20 सारख्या सर्वात लहान फॉर्मेटमध्ये." (PC-AFP)

5 / 5
लसिथ मलिंगाने  श्रीलंकेच्या क्रिकेट संघात 2004 मध्ये एन्ट्री घेतली होती.त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 30 कसोटी सामन्यांमध्ये 101 बळी घेतले. एकदिवसीय सामन्यांमध्ये बराच यशस्वी झाला. त्यात त्याने 338 बळी घेतले आणि टी20 मध्ये त्याने 107 बळी घेतले. तसेच 127 आयपीएल सामन्यांमध्ये 179 बळी घेतले. (PC-AFP)