
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. भारत आशिया कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. (Photo Credit : @MdShami11 X Account)

आशिया कप 2025 स्पर्धेला 1984 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून भारताने एकूण 8 वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. भारताला महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि या व्यतिरिक्त 3 दिग्गज कर्णधारांनी त्यांच्या नेतृत्वात भारताला आशिया कपमध्ये विजयी केलं आहे. (Photo Credit : @MdShami11 X Account)

भारताने पहिल्यांदा 1984 साली आशिया कप ट्रॉफी जिंकली होती. भारताने लिटिल मास्टर सुनील गावसकर यांच्यात नेतृत्वात आशिया कप ट्रॉफी जिंकली होती. भारताने महाअंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत हा कारनामा केला होता. (Photo Credit : Bcci X Account)

त्यानंतर भारताने 1988 साली दिलीप वेंगसकर यांच्या नेतृत्वात श्रीलंकेला पराभूत करत आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. भारताची आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण दुसरी वेळ ठरली होती. नवजोत सिंह सिद्धू यांनी अंतिम सामन्यात 76 धावांची खेळी केली होती. (Photo Credit : Bcci X Account)

त्यानंतर 1988 ते 1995 दरम्यान मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारताचं नेतृत्व केलं. अझरुद्दीन यांनी भारताला 1990 आणि 1995 साली आशिया कप ट्रॉफी मिळवून दिली होती. (Photo Credit : AFP)

भारताला 1995 नंतर आशिया कप जिंकण्यासाठी अनेक वर्ष प्रतिक्षा करावी लागली. महेंद्रसिंह धोनी याने ही प्रतिक्षा संपवली. धोनीने त्याच्या नेतृत्वात भारताला 2010 आणि 2016 साली (टी 20) आशिया कप ट्रॉफी जिंकून दिली होती. (Photo Credit : Icc X Account)

धोनीनंतर कर्णधार म्हणून रोहित शर्मा याने भारताची आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची घोडदौड कायम राखली. रोहितने भारताला 2018 मध्ये आशिया कप खिताब मिळवून दिला. तसेच भारताने रोहितच्याच नेतृत्वात 2023 मध्ये झालेली आशिया कप ट्रॉफी जिंकली होती. आता सूर्यकुमार त्याच्या नेतृत्वात भारताला पहिल्याच झटक्यात आशिया चॅम्पियन करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : Social Media)