IND vs WI : संजू सॅमसनची जर्सी घालण्याची सूर्यकुमार यादव याच्यावर वेळ! नेटकरी म्हणाले…

भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या वनडे सामन्यात 5 गडी राखून पराभूत केलं आहे. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

| Updated on: Jul 27, 2023 | 11:35 PM
1 / 6
वेस्टइंडिज विरुद्धचा पहिला वनडे सामना भारताने सहज जिंकला. वेस्ट इंडिजने विजयासाठी अवघ्या 114 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 5 गडी राखून पूर्ण केलं.

वेस्टइंडिज विरुद्धचा पहिला वनडे सामना भारताने सहज जिंकला. वेस्ट इंडिजने विजयासाठी अवघ्या 114 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 5 गडी राखून पूर्ण केलं.

2 / 6

भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं.भारतीय खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आले तेव्हा टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनची जर्सी घातली होती.

3 / 6

सूर्यकुमार यादवच्या जर्सीवर सॅमसन लिहिलेले होते आणि 9 क्रमांकही होता.

4 / 6

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते आणि सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला होता.

5 / 6

सूर्यकुमार यादव याने 25 चेंडूत 19 धावा केल्या. यात 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. मोटीच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला.

6 / 6

सूर्यकुमार जर्सी घालून मैदानात आला तेव्हा नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us