आउट ऑफ फॉर्म असलेल्या बाबर आझमकडे इतिहास रचण्याची संधी, ख्रिस गेलचा विक्रम मोडणार का?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. हा सामना उपांत्य फेरीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना या सामन्यात बाबर आझमकडे विक्रम रचण्याची संधी आहे. काय ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 20, 2026 | 7:24 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान बाबर आझम फुसका बार ठरला आहे. साखळी फेरीत त्याला काहीच करता आलं नाही. त्यामुळे त्याला प्लेइगंग 11 मध्य ठेवायचं की नाही असा प्रश्न पडला आहे. नामिबियाविरूद्धच्या सामन्यात तर त्याला फलंदाजीची संधीच दिली नाही.  (Photo- PTI)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान बाबर आझम फुसका बार ठरला आहे. साखळी फेरीत त्याला काहीच करता आलं नाही. त्यामुळे त्याला प्लेइगंग 11 मध्य ठेवायचं की नाही असा प्रश्न पडला आहे. नामिबियाविरूद्धच्या सामन्यात तर त्याला फलंदाजीची संधीच दिली नाही. (Photo- PTI)

2 / 5

सुपर 8 फेरीत पाकिस्तानचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना 21 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी बाबर आझमकडे आहे. (Photo- PTI)

3 / 5

बाबर आझमकडे टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याची संधी आहे. यासाठी बाबर आझमला फक्त 20 धावांची गरज आहे. पण सध्याची त्याची स्थिती पाहता या धावाही खूप आहेत. (Photo- PTI)

4 / 5

बाबर आझमने 20 धावा केल्या तर सर्वात वेगाने हा टप्पा गाठणारा फलंदाज ठरू शकतो. सध्या हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 343 डावात ही कामगिरी केली आहे. तर विराट कोहलीला यासाठी 360 डाव लागले. (Photo- PTI)

5 / 5

बाबर आझमने टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 334 डावात 11880 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धचा सामना त्यासाठी 335 डाव असेल. या सामन्यात 20 धावा करताच 12 हजार धावा करणारा 12वा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानकडून शोएब मलिकने ही कामगिरी केली आहे. (Photo- ICC Twitter)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us