
टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर टीम इंडियातील काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशात टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या इंग्लंडमध्ये पोहचला आहे. हार्दिकने इंग्लंडमधील काही फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

हार्दिक पंड्या याच्यासह या फोटोंमध्ये कृणाल पंड्या आणि ईशान किशन दिसत आहेत. तिघेही एकदम रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. हार्दिक आणि कृणालने एकमेकांच्या खांद्यावर हात टाकले आहेत. तर ईशानही या फोटोत दिसत आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

ईशान किशन सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत खेळत आहे. तर कृणाल आणि हार्दिक दोघेही सध्या निवांत आहेत. हार्दिक नक्की कुठे आहे? हे त्याने सांगितलं नाही.मात्र ईशान इंग्लंडमध्ये खेळत आहे. त्यामुळे पंड्या बंधूही इंग्लंडमध्ये असल्याचं अंदाज वर्तवण्यात येत आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

हार्दिक आणि कृणाल दोघेही अखेरीस आयपीएलच्या 18 व्या मोसमात खेळत होते. कृणालने आरसीबीला 18 व्या वर्षी पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. तर हार्दिकने त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला क्वालिफायर-2 पर्यंत पोहचवलं. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

तर दुसऱ्या बाजूला ईशान किशन याने काउंटी चॅम्पिनशीपमध्ये पदार्पण केलं. ईशानने नॉटिंघमशरकडून खेळताना यॉर्कशर विरुद्ध पदार्पणात 87 धावांची खेळी केली. ईशानच्या या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. (PHOTO CREDIT- GETTY)