
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्ध तडाखेदार अर्धशतक ठोकलं. रोहितने यासह मोठा कीर्तीमान केला आहे.

रोहित शर्मा याचं पाकिस्तान विरुद्धचं अर्धशतक हे त्याच्या वनडे करिअरमधील 50 वं अर्धशतक ठरलं. रोहितने यासह मोठा रेकॉर्ड केला आहे.

रोहित टीम इंडियाकडून 50 अर्धशतक करणारा आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितने पाकिस्तान विरुद्ध 56 धावांची खेळी केली.

रोहितने 49 बॉलमध्ये 6 कडक फोर आणि 4 खणखीत सिक्स ठोकले. रोहितने या दरम्यान शुबमन गिल याच्यासोबत 121 धावांची सलामी भागीदारी केली.

दरम्यान पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील मुख्य दिवसाचा खेळ वाया गेला. त्यामुळे आता राखीव दिवशी 11 सप्टेंबर रोजी सामना पार पडणार आहे.