भारतीय संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा, टी20 फॉर्मेटमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा संघ

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. टी20 फॉर्मेटमध्ये भारतीय संघाने दोन टी20 वर्ल्डकप आपल्या नावावर केले आहेत. तसेच अनेक विक्रम भारतीय खेळाडूंच्या नावावर आहेत. आता आणखी एक विक्रम नावावर झाला आहे.

| Updated on: Sep 19, 2025 | 11:16 PM
1 / 5
आशिया कप स्पर्धेत भारताची अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली आहे. युएई आणि पाकिस्तानला पराभूत करत भारताने सुपर 4 फेरीत जागा पक्की केली आहे. ओमानविरुद्धही भारताने 188 धावांचा डोंगर उभा केला आहे. असं असताना भारतीय संघाने एका विक्रमाची नोंद केली आहे. (Photo_ BCCI)

2 / 5
भारतीय संघ टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 250 वा सामना ओमानविरुद्ध खेळत आहे. 250 किंवा त्याहून अधिक टी20० सामने खेळणारा भारत हा दुसरा संघ बनला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत एकूण 275 टी20 सामने खेळले आहेत. (Photo_ BCCI)

3 / 5
भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 249 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यापैकी 166 जिंकले आहेत आणि 71 मध्ये पराभव झाला आहे. सहा सामने बरोबरीत सुटले आहेत आणि सहा सामन्यांचा निकाल लागला नाही.  (Photo_ BCCI)

4 / 5
भारताने आतापर्यंत दोनदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने टी20 विश्वचषक जिंकला होता. (Photo_ BCCI)

5 / 5
आशिया कप टी20 स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. याकडे आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून पाहीलं जात आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. (Photo_ BCCI)