Cricket : टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना लॉटरी, प्रत्येकाला मिळणार 1 कोटी रुपये, बीसीसीआयची मोठी घोषणा

Indian Cricket Team : बीसीसीआयने मोठी घोषणा करत टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना मोठी गूड न्यूज दिली आहे. बीसीसीआयने या 5 खेळाडूंची नावं जाहीर करत त्यांना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे हे खेळाडू आजचा दिवस कधीच विसरणार नाहीत.

| Updated on: Apr 21, 2025 | 5:59 PM
1 / 6
बीसीसीआयने आज 21 एप्रिलला वार्षिक कराराची घोषणा केली आहे. बीसीसीआयने या वार्षिक करारात पहिल्यांदाच 5 खेळाडू्ंना संधी दिली आहे. या खेळाडूंचा सी ग्रेडमध्ये समावेश केला आहे. ते 5 खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

2 / 6
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याची पहिल्यांदा वार्षिक करारासाठी निवड करण्यात आली आहे. हर्षितने चॅण्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. हर्षितने टीम इंडियाचं 2 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 1 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. (Photo Credit : @KKRiders X Account)

3 / 6
बीसीसीआयने नितीश कुमार रेड्डी याचीही वार्षिक करारात पहिल्यांदा निवड केली आहे. नितीश कुमार रेड्डी टीम इंडियासाठी 5 टेस्ट आणि 4 टी 20I सामने खेळला आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 6
टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने गेल्या काही महिन्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. अभिषेकने टीम इंडियाचं 17 टी 20 सामन्यांमध्ये 2 शतकांसह 535 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 6
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली. वरुणने 3 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेत निर्णायक योगदान दिलं होतं. तेव्हापासूनच वरुणला वार्षिक करारात स्थान मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. (Photo Credit : PTI)

6 / 6
आकाश दीप यालाही वार्षिक करारात पहिल्यांदा स्थान मिळालं आहे. आकाशने टीम इंडियाचं 7 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. आकाशने या 7 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. या 5 खेळाडूंचा सी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या खेळाडूंना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये मिळणार आहेत.  (Photo Credit : PTI)