SL vs IND : श्रीलंका दौऱ्यातून या खेळाडूचा पत्ता होणार कट! कसोटी मालिकेसाठी या दिवशी संघाची घोषणा
झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज होणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. याबाबत बीसीसीआयने एक अपडेट दिला आहे. निवड समिती खेळाडूंच्या फिटनेस रिपोर्टसाठी थांबले असून लवकरच घोषणा केली जाईल.

भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना 15 ऑगस्टला असणार आहे. असं असताना या सामन्याच्या निदान 15-20 दिवसाआधीच संघाची घोषणा होणं भाग आहे. असं असताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी याबाबत अपडेट दिले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं की, कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा 28 जुलैला होऊ शकते. (Photo: PTI)

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, निवड समितीला खेळाडूंच्या फिटनेस रिपोर्टबाबत माहिती हवी आहे. त्यानंतर संघाची घोषणा केली जाईल. हा दौरा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. (Photo: PTI)

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यात पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टला गॉल मैदानात, तर दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टला कोलंबोत होणार आहे. (Photo: PTI)

टीम इंडियाची निवडीनंतर भारतीय संघ 4 ऑगस्टला श्रीलंकेत रवाना होणार आहे. तिथे 7 ऑगस्टपासून एक 4 दिवसांची वॉर्मअप सामना खेळणार आहे. (Photo: PTI)

श्रीलंका दौऱ्यासाठी नितीश कुमार रेड्डीचं संघात निवड होणं कठीण दिसत आहे. रिपोर्टनुसार, नितीश कुमार रेड्डी अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नितीश अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग होता. (Photo: PTI)