
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. निवृत्तीनंतरही धोनी सोशल मीडियातून चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असतो.

महेंद्रसिंह धोनी याने वर्ल्ड कपच्या काही तासांआधी आपला नवा लूक शेअर केला आहे. धोनीने हटके हेअर स्टाईल केली आहे. धोनीच्या या हेअर स्टाईलची एकच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

या नव्या लुकमध्ये धोनीने लांब केस ठेवले आहेत. या नव्या लुकमुळे पुन्हा एकदा धोनीचा जुना अंदाज आठवला आहे.

धोनीन या व्हायरल फोटोंमध्ये काळी टी शर्ट आणि चश्मा घातला आहे. धोनीच्या या फोटोची एकच चर्चा रंगली आहे.

धोनीने इंस्टाग्रामवर आपले विविध पोजमधले फोटो शेअर केले आहेत. धोनीच्या या फोटोंवर नेटीझन्स भरभरुन कमेंट करत आहेत.

दरम्यान धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र धोनी अजूनही आयपीएलमध्ये खेळतोय.