
टीम इंडियाचे माजी चीफ सिलेक्टर चेतन शर्मा पुन्हा एकदा सिलेक्टरच्या भूमिकेत आहेत. दुलीप ट्रॉफीसाठी त्यांनी नॉर्थ झोनची टीम निवडलीय. एका स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा यांना टीम इंडियाच्या मुख्य सिलेक्टर पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

चेतन शर्मा यांनी नॉर्थ झोनची टीम निवडलीय. मनदीप सिंहकडे टीमच नेतृत्व सोपवलय. मनदीप सिंह या आयपीएल सीजनमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळला होता. तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता.

मनदीप सिंहने केकेआरसाठी 3 सामन्यात फक्त 14 धावा केल्या. या खेळाडूचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड शानदार आहे. रणजी ट्रॉफीच्या सीजनमध्ये त्याने 10 डावात 463 धावा केल्या आहेत.

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सिलेक्शन कमिटीने मुंबई इंडियन्सच्या नेहल वढेराला स्थान दिलं नाही. आयपीएल सीजनमध्ये नेहल वढेराने शानदार प्रदर्शन केलं होतं. तुम्हाला धक्का बसला असेल पण चेतन शर्मा टीम इंडियाचे सिलेक्टर झालेले नाहीत.

नॉर्थ झोनची टीम: प्रभसिमरन सिंह, प्रशांत चोपड़ा, ध्रुव शौरे, अंकित कल्सी, मनदीप सिंह (कॅप्टन), अंकित कुमार, पुल्कित नारंग, निशांस सिंधु, मनन वोहरा, जयंत यादव, बलतेज सिंह, वैभव अरोड़ा, हर्षित राणा, सिद्धार्थ कौल आणि आबिद मुश्ताक.