
लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर झाले. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युसूफ पठाण याने पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. युसूफ पठाणने सलग 5 टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला. या निमित्ताने आतापर्यंत टीम इंडियासाठी खेळलेले आणि त्यानंतर लोकसभेत निवडून गेलेल्या दिग्गज क्रिकेटपटूंबाबत आपण जाणून घेऊयात.

कॉमेंट्रीचे 'सरदार'आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिधू यांनी 2004 ते 2014 पर्यंत लोकसभेचे खासदार होते. सिद्धू यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन 2009 साली लोकसभेत निवडून गेले. अजहरुद्दीन यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र सध्या ते सक्रीय राजकारणात नाहीत.

टीम इंडियाने 1983 साली वर्ल्ड कप जिंकला होता. कीर्ती आझाद या वर्ल्ड कप विजेता संघात होते. क्रिकेटला रामराम केल्यानंतर आझाद यांनी राजकारणात पदार्पण केलं. आझाद 2014 साली भाजपकडून दरभंगा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.

टीम इंडिायाचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान 1991 साली भाजपच्या तिकीटावर लोकसभेत निवडून गेले. तसेच चेतन चौहान हे उत्तर प्रदेशमधून आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केलं.

टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर 2019 साली पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. गंभीरने आपच्या आतिशी मर्लेना आणि काँग्रेसचे अरविंदर सिंह लवली यांना पराभूत केलं होतं.