
भारत आणि इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात काय होते? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन सामन्यात 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसऱा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे. दरम्यान भारताने या मालिकेत एक मोठा विक्रम रचला आहे. (Photo : BCCI Twitter)

भारताने विदेशी भूमीवर कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडून इतिहास रचला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजने 1974-75 कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याची किमया साधली होती. पण आता हा भारताने विक्रम मोडीत काढला आहे. (Photo : BCCI Twitter)

वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध 1974-75 या वर्षात खेळलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 32 षटकार मारले होते. त्यानंतर कोणत्याही संघाने विदेशी भूमीवर इतके षटकार मारले नव्हते. भारताने हा विक्रम 50 वर्षानंतर मोडीत काढला आहे. (Photo : BCCI Twitter)

भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत एकूम 35 षटकार मारले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात 12 आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात 18 षटकार मारले होते. तेव्हा षटकारांची संख्या 30 होती. (Photo : BCCI Twitter)

भारताने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात एकूण पाच षटकार मारले. तसेच वेस्ट इंडिजचा 32 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. अजूनही भारताचा एक डाव शिल्लक आहे. (Photo : BCCI Twitter)