वनडे सामन्यात सर्वात बेस्ट कॅप्टन कोण? रोहित शर्मा की महेंद्रसिंह धोनी? आकडेवारी वाचल्यानंतर…

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उतरणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाची लिटमस टेस्ट इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत होत आहे. इंग्लंडला पहिल्या वनडे सामन्यात पराभूत करत रोहित शर्माने पराभवाची मालिका संपुष्टात आणली आहे. रोहित शर्माने पुन्हा एकदा कर्णधार म्हणून आपली बाजू जोरकसपणे मांडली आहे.

| Updated on: Feb 07, 2025 | 4:38 PM
1 / 6
आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवून दिल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाला नजर लागल्यासारखं दिसत आहे. वनडे आणि कसोटी मालिकेत पराभवाला सामोरं लागलं. वनडे मालिकेतील पराभवामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. रोहित शर्माने निवृत्ती घ्यावी असा सूर आळवला जात आहे. कारण रोहित शर्मा कर्णधार आणि खेळाडू म्हणून अपयशी ठरला आहे.

2 / 6
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याच्या नेतृत्वाचा कस लागला आहे. पण पहिला वनडे सामना जिंकून रोहितने सलग सहा सामने गमवण्याची मालिकेत खंड पाडला आहे. रोहित शर्मा खेळाडू म्हणून यशस्वी ठरला नसला तरी कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे.

3 / 6
टी20 वर्ल्डकपनंतर टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची वनडे मालिका जिंकली होती. पण त्यानंतर एकही सामना जिंकता आला नाही. श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने गमावावी लागली.

4 / 6
न्यूझीलंडनेही भारतात येऊन टीम इंडियाला कसोटीत व्हाईटवॉश दिला. तीन सामन्यांची कसोटी मालिका भारताने 3-0 ने गमावली. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकला. पण त्या सामन्याचं नेतृत्व जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर होतं. तर तीन सामन्यात रोहितने नेतृत्व केलं आणि तीन पैकी 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर एक सामना अनिर्णित ठरला.

5 / 6
इंग्लंडविरुद्धचा पहिला वनडे सामना जिंकून रोहित शर्माने पुन्हा एकदा सर्वोत्तम कर्णधार असल्याचं सिद्ध केलं आहे. रोहित शर्माने 49 वनडे सामन्यात संघाचं नेतृत्व केलं. त्यामुळे 35 सामन्यात टीम इंडियाला विजय मिळाला आहे.

6 / 6
एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 30 वनडे सामने जिंकले आहेत. तर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 49 पैकी 38 सामन्यात विजय मिळवला आहे.