
महेंद्रसिंह धोनी याने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात सर्वाधिक सामने जिंकून दिले आहेत. धोनीने भारताला सेना कन्ट्रीत 44 सामने जिंकून दिलेत.

विराट कोहली या यादीत दुसर्या स्थानी आहे. विराटने टीम इंडियाला 37 वेळा विजय मिळवून दिलाय.

या यादीत टीम इंडियाचा 'दादा' अर्थात सौरव गांगुली तिसऱ्या स्थानी आहे. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने 26 सामन्यात यश मिळवलं.

भारताला सेना देशांमध्ये सर्वाधिक विजय मिळवून देण्यात चौथ्या स्थानी मोहम्मद अझहरुद्दीन आहे. अझहरुद्दीन याने आपल्या नेतृत्वात भारताला 19 सामन्यात विजयी केलं आहे.

कपिल देव यांनी भारताला 1983 साली पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला. या माजी दिग्गज कर्णधाराच्या नेतृत्वात भारताने 14 सामने जिंकले आहेत.