
यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड विरुद्ध पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. यशस्वीने या खेळीत 159 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह 101 धावांची खेळी केली. (Photo Credit- PTI)

यशस्वीने केलेल्या या खेळीमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. यशस्वीने त्याच्या कारकीर्दीत इंग्लंडमधील पहिल्याच कसोटीत शतक केल्याने त्याच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यानिमित्ताने यशस्वी पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आलाय. यशस्वीची रुमर्ड गर्लफ्रेंड मॅडी हॅमिल्टन इंग्लंडमध्ये राहते. रिपोर्ट्सनुसार, यशस्वी आणि मॅडी एकमेकांना डेट करत आहेत. (Photo Credit- Instagram)

मॅडी अनेकदा आयपीएल सामन्यात स्टेडियममध्ये यशस्वीला सपोर्ट करताना दिसली आहे. मॅडी सोशल मीडियावर राजस्थान रॉयल्सच्या जर्सीतील स्वत:चे फोटो पोस्ट केले आहेत. यशस्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करतो. (Photo Credit- Instagram)

यशस्वी आणि मॅडी दोघेही गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. यशस्वीने एकदा मॅडी आणि तिचा भाऊ हॅन्रसह एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. "वेळ निघून जाऊ शकते, पण नातं संपत नाही", असं कॅप्शन यशस्वीने या फोटोला दिलं होतं. त्यामुळे यशस्वी आणि मॅडीमध्ये काही तरी सुरु असल्याची चर्चा रंगली होती. (Photo Credit- Instagram)

मॅडी आयपीएल 2024 नंतर आणखी चर्चेत आली. मॅडी राजस्थान रॉयल्सच्या एका सामन्याला उपस्थित होती. मात्र यशस्वी आणि मॅडी या दोघांनी अद्याप नात्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Photo Credit- X)