
दक्षिण आफ्रिकेला हरवून T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीसह भारतात परतली आहे. टीम इंडियाने शनिवारी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला धुळ चारली.

भारतीय टीम दिल्ली एअर पोर्टवर आल्यानंतर सगळ्यांच्या नजरा ट्रॉफीवर होत्या. खेळाडू सुद्धा ट्रॉफीसोबत जोशमध्ये दिसले.

वर्ल्ड कपची ट्रॉफी तर भारतात आली, पण ती कुठे ठेवणार याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

सर्वात महत्त्वाच म्हणजे वर्ल्ड कपची मुख्य ट्रॉफी खेळाडूंना दिलीच जात नाही. खरी ट्रॉफी आयसीसी नेहमीच आपल्याकडे ठेवते. रेप्लिक म्हणजे प्रतिकृती ट्रॉफी दिली जाते.

आयसीसीने प्रत्येक टिमच्या हिशोबाने ट्रॉफी ठेवल्या आहेत. शोकेस बनवलं आहे. रेप्लिक ट्रॉफी टीमला का दिली जाते?. खेळाडू ही ट्रॉफी आपल्याकडे ठेवत नाहीत. क्रिकेट बोर्ड ही ट्रॉफी आपल्याकडे ठेवतं. म्हणजे ही ट्रॉफी आता बीसीसीआयच्या शोकेसमध्ये दिसेल.