
कॅप्टन सूर्यकुमार यादवची बॅट शांत असल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. सूर्याला इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये काही विशेष असं करता आलेलं नाही. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

इंडिया-इंग्लंड यांच्यातील तिसरा टी 20i सामना हा मंगळवारी 28 जानेवारीला खेळवण्यात आला. सूर्याने या सामन्यात 14 धावा केल्या. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

सूर्याला पहिल्या 2 सामन्यातही काही करता आलं नाही. सूर्या ईडन गार्डमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात झिरोवर ढेर झाला. तर चेन्नईत झालेल्या दुसऱ्या सामन्यात कर्णधाराने 12 धावा केल्या. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

सूर्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्येच धावा होत नाहीत, अशातला काही भाग नाही. सूर्याला गेल्या 10 डावांमध्ये फक्त 1 अर्धशतकच झळकावता आलं आहे. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

सूर्याला गेल्या 10 पैकी फक्त 5 वेळाच दुहेरी आकडा गाठता आला आहे. सूर्याने अनुक्रमे 8, 29, 8, 75, 21, 4, 1, 00, 12 आणि 14 अशा धावा केल्या आहेत. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

सू्र्याने टी 20i कारकीर्दीतील 81 टी 20i सामन्यांमधील 77 डावांत 39.33 च्या सरासरी आणि 167.70 च्या स्ट्राईक रेटने 2 हजार 596 धावा केल्या आहेत. सूर्याने या दरम्यान 4 शतकं आणि 21 अर्धशतकं लगावली आहेत.(Photo Credit : Suryakumar Yadav X Account)