
अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0 अशी जिंकल्यानंतर पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघ आयसीसी वनडे संघ क्रमवारीत नंबर 1 वर पोहोचला आहे.

पाकिस्तान सध्या 118 गुण 2575 पॉईंट्सने नवीन आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचे 118 गुण आहेत. पण पॉईंट्स 2714 इतके आहेत.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलिया सप्टेंबरमध्ये एकूण आठ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे पहिलं स्थान गाठण्याची संधी आहे. या आठ सामन्यांपैकी 5 सामने दक्षिण आफ्रिके विरुद्ध, तर भारताविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल.

तिसऱ्या क्रमांकावर असलेली टीम इंडिया गुणांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियापेक्षा पाच गुणांनी मागे आहे. न्यूझीलंड 104 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे.विश्वविजेता इंग्लंड 101 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका 1-2 ने गमावल्याने सातव्या स्थानावर आहे.

बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.