
मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. गुरुवारी 23 ऑक्टोबरला भाऊबीज झाली. भाऊबीजनिमित्ताने टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने त्याची बहिण किना द्विवेदी सोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. (Photo Credit: Instagram)

युझीने क्विना व्यतिरिक्त इतर बहिणींसह भाऊबीज साजरी केली. चहलने त्याच्या सर्व बहिणींसोबतचे फोटोही पोस्ट केले. तसेच "हॅप्पी भाई दूज" असं कॅप्शन युझीने या फोटोंना दिलं. (Photo Credit: Instagram)

युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर बहिणींसोबत पोस्ट केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या. या फोटोंवर टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर यानेही कमेंट केली. (Photo Credit: Instagram)

युझवेंद्र चहलने पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट करताना शब्दात काहीच लिहलं नाही. श्रेयसने इमोजीद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रेयसने हाय-फायवाली इमोजी कमेंट केली. जल्लोष आणि आनंदीआनंद असा या इमोजीचा अर्थ होतो. (Photo Credit: Instagram)

किना द्विवेदी ही कायद्याची जाणकार आहे. क्विनाने कायद्याचे शिक्षण घेतलंय. क्विना आणि युझवेंद्र या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photo Credit: Instagram)