Rishabh Pant परतताच सांभाळणार नेतृत्वाची धुरा, विकेटकीपरचं या सामन्यातून कमबॅक फिक्स!

Rishabh Pant Comeback : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यातील दुखापतीनंतर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऋषभ मैदानात केव्हा उतरणार? जाणून घ्या तारीख.

| Updated on: Oct 10, 2025 | 3:03 PM
1 / 5
टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं कमबॅक होणार आहे.  या दोघांच्या पुनरागमनाची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. तसेच विकेटकीपर बॅट्समन आणि कसोटी संघाचा उपकर्णधार ऋषभ पंत याच्या कमबॅकचीही चाहत्यांना उत्सूकता आहे.  (Photo Credit: PTI)

2 / 5
ऋषभ पंतला इंग्लंड दौऱ्यात मँचेस्टरमधील कसोटी सामन्यात पायाला दुखापत झाली होती.  पंतला या दुखापतीमुळे पाचव्या आणि अंतिम कसोटीला मुकावं लागलं होतं. पंत तेव्हापासून कमबॅकसाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
ऋषभ दुखापतीनंतर बंगळुरुत बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये होता. सीओएमध्ये रिहॅब पूर्ण केल्यांनतर पंतने सरावाला सुरुवात केली आहे. पंत आता रणजी ट्रॉफीतून कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Photo Credit : Rishabh Pant Instagram)

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. पंत या फेरीतील सामन्यातून कमबॅक करणार आहे. पंत यासह दिल्ली टीममध्ये कमबॅक करणार आहे. इतकंच नाही तर पंतला नेतृत्वाची जबाबदारी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या आयुष बदोनी याच्याकडे दिल्लीच्या नेतृत्वाची सुत्रं आहेत. (Photo: PTI)

5 / 5
रणजी ट्रॉफी स्पर्धेला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. दिल्ली या मोहिमेतील आपला पहिला सामना हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे. मात्र पंत या सामन्यात खेळणार नसल्याचं समजत आहे. दिल्ली आपला दुसरा सामना 25 ऑक्टोबरपासून घरच्या मैदानात  खेळणार आहे. दिल्लीसमोर या सामन्यात हिमाचल प्रदेशचं आव्हान असणार आहे. पंत या सामन्यातून कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo: PTI)