
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. दोन सामने झाले असून तिसरा सामना लॉर्ड्सवर होणार आहे. हा सामना 10 जुलैपासून सुरु होणार आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानात प्रत्येक खेळाडूचं खेळण्याचं स्वप्न असतं.(PHOTO CREDIT- PTI)

लॉर्ड्स क्रिकेट मैदान 1814 साली थॉमस लॉर्ड यांनी तयार केलं होतं. हे त्यांचं तिसरं मैदान होतं. या मैदानात पहिला सामना 22 जून 1814 साली खेळला होता. तर 1884 मध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. हा सामना इंग्लंडने जिंकला होता. (PHOTO CREDIT- PTI)

लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड हे लंडनमधल सेंट जॉन्स वुड येथे आहे. लंडनमधील सर्वात महागड्या ठिकाणांपैकी एक आहे. मालमत्तेची किंमत ऐकूनच भल्याभल्यांना घाम फुटेल. त्यामुळे या मैदानाची किंमत तशीच आहे. मिडिया रिपोर्टनुसार, लॉर्ड्स क्रिकेट मैदानाची किंमत 26 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.(PHOTO CREDIT- GETTY)

लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अनेक ऐतिहासिक सामने झाले आहेत. 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामनाही येथे पार पडला. दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं होतं. (PHOTO CREDIT- PTI)

टीम इंडियाने लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर 19 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात फक्त 3 सामने जिंकले असून 12 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. तर 4 सामने ड्रॉ झाले आहेत. टीम इंडियाने शेवटचा सामना 2021 मध्ये जिंकला होता. (PHOTO CREDIT- PTI)