
आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.अशात आता द हंड्रेड या स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टी 20i संघाचा कर्णधार एडन मारक्रम याला एमएसजी अर्थात मॅनचेस्टर सुपर जायंट्सच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. मार्करम या आगामी हंगामातील सर्वात महागडा खेळाडू आहे. एडनसाठी फ्रँचायजीने जवळपास 2 कोटी 46 लाख रुपये मोजले. (Photo Credit : PTI)

सुपर जायंट्स फ्रँचायजीचे विविध लीग स्पर्धेत संघ आहेत. एडन मार्करम द हंड्रेड आणि आयपीएल व्यतिरिक्त एसए20 या लीग स्पर्धेतही सुपर जायंट्स फ्रँचायजीचं प्रतिनिधित्व करतो. एमएसजीचे हेड कोच जस्टीन लँगर यांनी कर्णधार म्हणून मार्करम प्रथम प्राधान्य असल्याचं सांगितलं. मार्करम हा शानदार खेळाडू आहे. तो नेतृत्वासाठी परिपूर्ण आहे, असं लँगरने म्हटलं. (Photo Credit : PTI)

एडनला नेतृत्वाचा तगडा अनुभव आहे. एडनच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने गेल्या 2 टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सलग उपांत्य फेरीत धडक दिली आहे. दक्षिण आफ्रिका 2024 साली उपविजेता होती. तर 2026 मध्ये त्यांचं उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आलं. (Photo Credit : PTI)

एडनने टी 20 कारकीर्दीत एकूण 226 सामन्यांमध्ये 5 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. एडनने 2 शतकं आणि 38 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 5 हजार 758 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

द हंड्रेड 2026 स्पर्धेचा थरार 21 जुलैपासून रंगणार आहे. या मोसमातील सलामीच्या सामन्यात सनरायजर्स विरुद्ध एमआय लंडन आमनेसामने असणार आहेत. तर 16 ऑगस्टला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. (Photo Credit : PTI)