
एजबेस्टन कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाने लॉर्ड्सवर विजयासाठी कंबर कसली आहे. या सामन्यात कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या सामन्यात काही विक्रम आपल्या नावावर करू शकतात. ( Photo: PTI)

कर्णधार शुबमन गिलचं लक्ष्य राहुल द्रविडच्या विक्रमावर असेल. राहुल द्रविडने इंग्लंडच्या भूमीवर बनवलेल्या 602 धावा करत विक्रम रचला आहे. शुबमन गिलला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 17 धावा करायच्या आहेत. ( Photo: PTI)

टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतच्या रडारवर एक विक्रम आहे. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होण्यापासून फक्त 5 षटकार दूर आहे. ( Photo: PTI)

भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत पंत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 86 षटकार आहेत. रोहित शर्मा 88 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर वीरेंद्र सेहवाग 90 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. ( Photo: PTI)

शुबमन गिलला कर्णधार म्हणून एक मोठी संधी चालून आली आहे. लॉर्ड्सवर कसोटी जिंकणारा चौथा भारतीय कर्णधार बनण्याची संधी असेल. कपिल देव, एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे. ( Photo: PTI)