
तिलक वर्मा भारताचा स्टार खेळाडू असून त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सलग पाच सामन्यात तिलक वर्माने सर्वाधिक धावा करत एक खास विक्रम नोंदवला आहे.

तिलक वर्माने तिसऱ्या टी20 सामन्यात 14 चेंडूत 1 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 18 धावा केल्या. पाचव्या सामन्यात त्याच्या नाबाद खेळीला खिळ बसली. पण मागच्या चार सामन्यात नाबाद राहिला. आदिल रशीदने तिलक वर्माची विकेट काढली.

तिलक वर्मा बाद झाला असला तरी त्याने एका खास विक्रमाची नोंद केली आहे. टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सलग पाच सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सलग पाच सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत विनोद कांबळी आघाडीवर आहे. त्याने 1993 मध्ये 224, 227, 125, 4 आणि 120 धावा केल्या होत्या. त्याने सलग पाच डावात एकूण 700 धावा करत सर्वाधिक धावांचा विक्रम केला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीचं नाव आघाडीवर आहे. त्याने वनडे क्रिकेटच्या पाच डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीने 2012 मध्ये 133*, 108, 66., 183 आणि 106 धावा केल्या. त्याने पाच डावात एकूण 596 धावा केल्या आणि सलग पाच डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

तिलक वर्माने टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सलग 5 डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. तिलक वर्माने 107*, 120*, 19*, 72*, 18 धावा करत ही कामगिरी केली आहे.टीम इंडियासाठी सलग 5 डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.