Vaibhav Sooryavanshi World Record : वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानचा सगळा राग UAE वर काढला, इतकं चोपलं की 28 SIX अन..नवीन वर्ल्ड रेकॉर्ड

Vaibhav Sooryavanshi World Record : आशिया कप रायजिंग टुर्नामेंटमध्ये भारताचा युवा ओपनर वैभव सूर्यवंशी पाकिस्तान विरुद्ध अपयशी ठरला होता. पण तोच सर्व राग त्याने यूएईवर आज काढला. यूएईच्या गोलंदाजांचा अक्षरश: पालापाचोळा केला.

| Updated on: Nov 24, 2026 | 5:57 PM
1 / 5
आज दोहाच्या स्टेडियममध्ये वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ घोघावलं. या वादाळाने वेगवान शतकाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. वैभव सूर्यवंशीने अवघ्या 28 चेंडूत UAE विरुद्ध शतक ठोकलं. वैभवने 14 सिक्सच्या बळावर शतक पूर्ण केलं. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाची नोंद वैभव सूर्यवंशीच्या नावावर झाली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या जेन फ्रेजर मॅगर्कचा रेकॉर्ड मोडला.

2 / 5

जॅक फ्रेजर मॅगर्कने तस्मानिया विरुद्ध 29 चेंडूत शतक ठोकलं होतं. एबी डिविलियर्सने 31 चेंडूत वेस्ट इंडिज विरुद्ध शतक ठोकलं होतं. साकिबुल गनीने 32 चेंडूत अरुणाचल प्रदेश विरुद्ध शतक झळकावलं होतं. इशान किशनने 33 चेंडूत कर्नाटक विरुद्ध शतक ठोकलं होतं.

3 / 5

वैभव सूर्यवंशी आपल्या इनिंगचे पहिले दोन चेंडू निर्धावर खेळला. पण नंतर तीन चेंडूवर त्याने जाहिद अलीला सलग तीन सिक्स ठोकले. पुढच्या ओव्हरमध्ये त्याने एक चौकार आणि दोन सिक्स मारले. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने दोन सिक्स मारुन अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

4 / 5

सिमरजीत सिंहच्या एका ओव्हरमध्ये तीन सिक्स मारुन त्याने पाचव्या ओव्हरमध्येच टीमची धावसंख्या 100 पार नेली. त्यानंतर वैभवने 6 चेंडूत तीन सिक्स आणि दोन चौकार मारुन शतक पूर्ण केलं. सूर्यवंशीने 15 सिक्स मारुन शतक पूर्ण केलं.

5 / 5

वैभवने 53 चेंडूत 204 धावा ठोकल्या. यात सात फोर आणि 28 सिक्स आहेत. UAE ने विजयासाठी दिलेलं 250 धावांचं आव्हान 14.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us