आयसीसी वनडे क्रमवारीत वरुण चक्रवर्तीची विक्रमी झेप

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीने आयसीसी एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत चांगला फायदा झाला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यात वरुणने 7 विकेट्स घेतल्या आहेत.

| Updated on: Mar 05, 2025 | 5:56 PM
1 / 5
वरुण चक्रवर्ती हा भारताचा मिस्ट्री फिरकीपटू म्हणून ओळखला जातो. वरुण चक्रवर्तीने टीम इंडियात पुनरागमन केलं आहे. मेहनत आणि गोलंदाजीत सुधारणा करून पुन्हा एकदा त्याने टीम इंडियात स्थान पक्कं केलंआहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या वरुणला आयसीसीकडून मोठी भेट मिळाली आहे.

2 / 5
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फिरकी गोलंदाजाने जगातील 143 गोलंदाजांना मागे टाकून मोठी झेप घेतली आहे. आता त्याने टॉप 100 मध्ये प्रवेश केला असून 97व्या स्थानावर पोहोचला आहे.

3 / 5
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात सात विकेट्स घेतल्या आहेत. या सात विकेट्सपैकी पाच विकेट्स एकाच सामन्यात आल्या. इतकंच काय तर स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.

4 / 5
श्रीलंकेचा महेश तीक्षणा 680 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंडचा मॅट हेन्री तीन स्थानांची झेप घेऊन तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

5 / 5
एकदिवसीय गोलंदाजांच्या यादीत टॉप 10 मध्ये स्थान मिळवणारा कुलदीप यादव हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. ताज्या क्रमवारीत कुलदीप तीन स्थानांनी घसरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 11 व्या स्थानावर, तर रवींद्र जडेजा 13व्या स्थानावर आहे.