AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anita Kanwal: मी भीक मागत नाहीये..; 72 वर्षीय अभिनेत्री संतापल्या, म्हणाल्या, रात्रभर झोप लागली नाही

Anita Kanwal : आपल्या आर्थिक परिस्थितीबाबत चुकीच्या बातम्या देणाऱ्यांवर ज्येष्ठ अभिनेत्री अनिता कंवल भडकल्या आहेत. मी लोकांकडे भीक मागत नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलं. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या..

Anita Kanwal: मी भीक मागत नाहीये..; 72 वर्षीय अभिनेत्री संतापल्या, म्हणाल्या, रात्रभर झोप लागली नाही
Anita KanwalImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 21, 2026 | 11:36 AM
Share

मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अनिता कंवल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. वयाच्या 72 व्या वर्षी आर्थिक परिस्थिती आणि काम मिळवण्याच्या अडचणींबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता या बातम्यांवर अनिता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या जुन्या मुलाखतीतील विधानांचा चुकीचा अर्थ लावून आपण लोकांकडे आर्थिक मदत मागत असल्याचं चित्र रंगवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या वृत्तांमुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाला असून रात्रभर झोपही लागली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत त्या म्हणाल्या, “पहाटेचे 3.45 वाजले आहेत आणि मी झोपू शकत नाहीये, कारण आज काही वृत्तवाहिन्यांनी माझ्याबद्दल अशा बातम्या दाखवल्या आहेत, ज्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले आहेत. सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत मला प्रश्न विचारण्यात आला होता की, हाती काहीच काम नसताना तुम्ही किती दिवस आर्थिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी सांभाळू शकता. त्यावर मी उत्तर दिलं होतं की, एक ते दीड वर्ष. या गोष्टीचं अशा सणसणीत बातमीत रुपांतर करून दाखवलं जातंय की मी लोकांकडे पैसे मागतेय. जेव्हा अमिताभ बच्चन यश चोप्रा यांच्याकडे गेले आणि म्हणाले की माझ्याकडे काम नाहीये, मी आर्थिकदृष्ट्या संघर्ष करतोय, तेव्हा कोणी अशा बातम्या छापल्या नव्हत्या.”

पहा व्हिडीओ-

“माझं कुटुंब अत्यंत सक्षम आणि आदरपूर्वक आहे. फक्त काही गुंतवणुकीचे निर्णय चुकीचे ठरले आणि अशी चूक सर्वांकडून होते. पण आजसुद्धा माझ्यात काम करण्याची कुवत आहे. कामाच्या जोरावर मी आजही पुढील 10 वर्षांसाठीची सोय करू शकते, पण मला काम मिळत नाहीये. ही गोष्ट सहा महिन्यांपूर्वीची होती. त्यानंतर मी इन्स्टाग्रामवर रील्स करू लागले, मला ऑफर्स आणि कोलॅबरेशन मिळत गेले. तुम्ही अशा पद्धतीने लिहित आहात, जसं काय मी लोकांकडे पैशांची भीक मागतेय. ही खूप चुकीची गोष्ट आहे. जर मी माझ्या मुलांकडूनच पैसे घेत नाही, मग मी इतर कोणाकडून तरी का पैसे मागू? जगात अशी एक तरी व्यक्ती शोधून काढा, जी म्हणू शकेल की अनिता कंवलकडे एक रुपयाची उधारी आहे किंवा मी कोणाकडे पैसे मागितले. मी माझं नावंच बदलून टाकेन. या वयात माझी अशी बदनामी करू नका,” अशा शब्दांत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

याआधीच्या मुलाखतीत अनिता यांनी काम मिळवण्यातील अडचणी आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांच्याकडे स्वतःचं घर असून ते त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचं आर्थिक साधन असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. काही बचत शिल्लक असली, तरी भविष्यातील खर्च लक्षात घेता त्यांना पुन्हा काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. त्यांची मुलं मदत करण्यास तयार असली, तरी त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची इच्छा नसल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं होतं.

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी